समर्थ फार्मसीच्या मोहिनी चौधरीला आविष्कार २०२४ मध्ये कांस्य पदक

1 min read

बेल्हे दि.२९:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तळेगाव दाभाडे आयोजित सोलापूर-पुणे क्षेत्रीय आविष्कार २०२४ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

या स्पर्धेमध्ये सोलापूर व पुणे शैक्षणिक क्षेत्रातून एकूण ६५ विद्यालयामधून ३५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

आविष्कार २०२४ स्पर्धेमध्ये ६ वेगवेगळ्या विद्याशाखांचा समावेश केला गेला होता. त्यामधील शेती व पशुपालन या विद्याशाखेअंतर्गत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ची विद्यार्थिनी मोहिनी चौधरी हिने “शेतकरी वाचवा भविष्य वाचवा” या विषयावर सादरीकरण करून या स्पर्धेत कांस्य पदक अर्जित केले आहे अशी माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की यांनी दिली.

सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना आविष्कार स्पर्धा समन्वयक डॉ.कुलदीप वैद्य यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले.

त्याच बरोबर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,

समर्थ इन्स्टिट्युटऑफ फार्मसी चे विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे, संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे