डॉ.कदम गुरुकुल चे मेजर लीग बेसबॉल (MLB) स्पर्धेमध्ये अप्रतिम यश

1 min read

इंदापूर दि.२९:- पदुकोण द्रविड स्पोर्ट एक्सलन्स सेंटर बेंगलोर या ठिकाणी झालेल्या चौथ्या मेजर लीग बेसबॉल (MLB)11 वर्ष वयोगटांमध्ये डॉ. कदम गुरुकुल इंदापूर (पुणे यांकीज) संघाने अंतिम सामन्यात पानिपत हरियाणा संघाचा 6/2 ने पराभव करून मेजर लीग बेसबॉल (MLB) स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. सदरील साखळी सामन्यांमध्ये बेंगलोर, दिल्ली, मुंबई या संघाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी सामन्यामध्ये बेंगलोर संघाचा 16/ 2 ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तामिळनाडू संघाचा 14 /1 ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पानिपत हरियाणा संघाचा पराभव करून (MLB) 2024 चे विजेतेपद मिळवले. सदरील स्पर्धेतील बेस्ट पिक्चर अवॉर्ड साकिब मोहम्मद सय्यद याला मिळाला. मोस्ट ऑलीबल प्लेयर शिवम हनुमंत मोरे यास मिळाला. तसेच फस्टबेस अवॉर्ड शरवली ज्ञानेश्वर देवकर या खेळाडूला मिळाला. सदरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून डॉ. कदम गुरुकुल चे क्रीडाशिक्षक सोमनाथ महादेव नलवडे यांना मिळाला आणि सदरील स्पर्धेमधून शिवम मोरे व साकीब सय्यद यांची भारतीय सराव संघामध्ये निवड झाली.

विजयाचे शिल्पकार शिवम हनुमंत मोरे, साकिब मोहम्मद सय्यद, शरवली ज्ञानेश्वर देवकर, शिवराज सूर्यकांत कचरे, शाहू राजे संदेश देवकर, रुद्र अभिजीत पाटील, दर्शन विकास सावंत, वरून विलास वाघमारे, श्रेयांश मनोज मोरे, श्रेयांश संदिपान भुजबळ. शौर्य नितीन राऊत असिस्टंट कोच म्हणून दुर्वा सुहास भोंगळे व व्यंकटेश जयवंत शेटे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले.वरील स्पर्धेतील सर्व खेळाडूंचे आणि मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सोमनाथ नलवडे यांचे डॉ. कदम गुरुकुल चे अध्यक्ष डॉ. लहू कदम. शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य रिशी बासू, स्कूल मॅनेजर संदीप जगताप तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे