ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
1 min read
शिरूर दि.१४:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने कारेश्वर स्कुल येथे पार पडलेल्या शिरूर तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल शिरूर (ता.शिरूर) येथील ओम पारधी या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकावले व त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याचप्रमाणे आदिती पवार या विद्यार्थिनीने कांस्य पदक पटकावले. गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.राजेराम घावटे, उपाध्यक्ष दीपक घावटे, सचिव सविता घावटे, संचालक सुधीर शिंदे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, संचालक प्रसाद घावटे आदींनी विजेत्या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्या शोभा अनाप, क्रीडा शिक्षक संदीप पवार, चेस प्रशिक्षक विजय चोरडिया व इतर सर्व शिक्षकांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा तयारीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे क्रीडा शिक्षकांनी नमूद केले.