आळे केंद्रावर १२ वी चे १०२७ विद्यार्थी देणार परीक्षा

1 min read

आळे दि.१६:- ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे (ता. जुन्नर) येथे बुधवार दि.२१ बारावीची परीक्षा सुरू होणार असून सदर केंद्रावर १०२७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. केंद्र संचालक म्हणून भालेराव राजेंद्र तर उपकेंद्र संचालक म्हणून लांडगे मच्छिंद्र, खतोडे बाबासाहेब, कुऱ्हाडे सुरेश, गुंजाळ सचिन काम पाहणार आहेत. तसेच परीक्षेची सर्व पूर्व तयारी झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य भवारी संदीप यांनी दिली. तसेच परीक्षेच्या पूर्व नियोजनाची सर्व पर्यवेक्षकांची मीटिंग घेऊन परीक्षेचे सर्व कामकाज समजावून सांगण्यात आले. सदर केंद्रावर ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय आळे, विद्या विकास मंदिर उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी, विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज साकोरी. ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळे, जे. आर. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आळेफाटा, सद्गुरु सिताराम महाराज उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी पेंढार इत्यादी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर दक्षता समिती स्थापन करून त्यामध्ये आळे. संतवाडी, कोळवाडी गावचे सरपंच व आळे गावचे पोलीस पाटील, पालक सदस्य यांचा समावेश असणार आहे. सदर केंद्रावर पोलीस निरीक्षक होडकर सतीश आळेफाटा यांच्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे