इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धेमध्ये डीघोळ इस्लामपूर शाळेच्या दोन विद्यार्थीची निवड

1 min read

परभणी दि.१७:- भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्यातर्फे निवडण्यात आलेल्या २७ विद्यार्थ्यांपैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डीघोळ इस्लामपूर शाळेचे दोन विद्यार्थी नामांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डीघोळ च्या दोन विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवार्ड २०२३-२४ साठी नामांकन मिळाले आहे. एकूण पाच नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन दाखल केले होते. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची निवड इन्स्पायर अवॉर्ड साठी झाली असून वर्ग सातवीतील विद्यार्थी उमेश गंगाधर शिंदे व वर्ग सहावीची विद्यार्थिनी अनुष्का अभय हराळे यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस यातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक बळीराम बाबर व संदीप लष्करे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव शिंदे, मुख्याध्यापक रुस्तुम कानडे, सहशिक्षक अंगद थोरवे , सिकंदर शेख, मेहराज शेख, गोरे मॅडम, पठाण मॅडम युवा नेते नागनाथ दादा शिंगाडे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे