“समर्थ मेगा फेस्टिवल” ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; १२ हजार कुपनांची विक्री

1 min read

बेल्हे दि.१५:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकताच “समर्थ मेगा फूड फेस्टिवल २०२४” मोठ्या जल्लोषात आणि आनंदात संपन्न झाला. कला, मनोरंजन, साहित्य, विचार, प्रेरणादायी व्याख्यान या सर्वांसोबतच या नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन संकुला मध्ये नेहमी केले जाते. विद्यार्थी व कर्मचारी यांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता विद्यार्थ्यांना खूप प्रयत्न करावे लागत होते. या मेगा फूड फेस्टिवलच्या माध्यमातून खवय्यांना दर्जेदार खाद्य पदार्थ पुरवण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली होती. संकुलातील सर्वांनीच त्याचा मनमुराद आनंद घेतला. या “समर्थ मेगा फूड फेस्टिवल २०२४” चे उद्घाटन आळेफाटा पोलीस स्टेशनचे महेश बडगुजर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यांच्यासमवेत आळेफाटा येथील डॉ.सोनवणे, डॉ.रोहकले यांनी देखील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, सर्व विभागाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.“कुछ भी खाओ दस रुपये मे” अशी थीम ठेऊन संकुलातील विद्यार्थ्यांसाठी मेंदूवडा,इडली सांबर, पाणीपुरी, ओली भेळ,मंचुरियन,पावभाजी,वडापाव या खाद्यपदार्थांचे २७ स्टॉल कार्यान्वित केले होते. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील या खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा मनमुराद आनंद लुटला. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या सर्व स्टॉलचे नियोजन प्राचार्य,विभागप्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या केले होते. पाणीपुरीच्या स्टॉलवर भली मोठी रांग होती.अचानक गर्दी उसळल्यानंतर उडणारा गोंधळ आणि त्यावर स्वयंसेवक विद्यार्थ्यांना घेऊन यशस्वी नियोजन करताना केलेले प्रयत्न यामुळे हा मेगा फेस्टिवल अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडला. व्यावहारिक जीवनामध्ये व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, अचानक कमी पडलेला माल आणि वाढलेली लोकांची डिमांड याचे सूत्र आणि त्याची कशी सांगड घालायची याचे धडेच जणू काही आज विद्यार्थ्यांनी या मेगा फूड फेस्टिवल च्या माध्यमातून घेतलेले दिसून आले. एखाद्या स्टॉल वरील खाद्यपदार्थ विक्री करताना ग्राहकांना नाराज न होऊ देता वेळेनुसार केलेले बदल हेही विद्यार्थ्यांनी शिकायला मिळाले.या मेगा फूड फेस्टिवलच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांना व्यवसायाचे अचूक मार्गदर्शन त्याचप्रमाणे धडे गिरवता येतील यात शंका नाही असे यावेळी मेगा फूड फेस्टिवल चे समन्वयक डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले.समर्थ गुरुकुल चे संगीत शिक्षक राहुल दुधवडे सर यांनी गायलेल्या सुमधुर गीत गायनाने या मेगा फेस्टिवलची रंगत अजूनच वाढली.हा मेगा फेस्टिवल यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी डॉ.लक्ष्‍मण घोलप,प्रा.संजय कंधारे,प्रवीण ससाणे,विशाल ससाणे,बाळासाहेब हाडवळे,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,सुधीर कोकणे,दत्ता हांडे,प्रा.प्रदीप गाडेकर,डॉ.संतोष घुले,प्रा.अनिल कपिले,डॉ.बसवराज हातपक्की,क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे