पिंपरी चिंचवड मध्ये ओतूर कॉलेज येथील १९९० बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

1 min read

चिंचवड दि.१५:- आण्णासाहेब वाघेरे कॉलेज ओतूर येथील १९९० बॅच च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच चिंचवड येथील एका हॉटेल मध्ये पार पडला. मेळाव्यात मुंबई, नवी मुंबई,पालघर, पुणे ग्रामीण मधून हे १९९० च्या वाणिज्य शाखेचे माजी विद्यार्थी एकत्र जमले होते. याचे आयोजन खेड, पुणे शहर व पिंपरी चिंचवड करांच्या वतीने करण्यात आले. यावेळी सर्वच ठिकाणाहून सकाळी १० वाजता चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये जमले. सर्वाना एकत्र भेटून सुख दुःख व जुन्या आठवणींना उजाळा देत नाश्त्यावर ताव मारला. त्यानंतर सर्वाना फेटे बांधण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर जे विद्यार्थी आपल्यात आता हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात करताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या च्या अर्ध पुतळ्यास हार अर्पण करत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड सलीम पटेल, वंदना गावडे, (मुंबई)
मंगेश डुंबरे, शांता रोकडे, पुणे ग्रामीण) सतीश थोरात, मनीषा कासवा, आरती गतकळ, पांडुरंग शिंदे (पुणे व पिंपरी चिंचवड शहर)नियुक्ती करून पुढील कार्यक्रम सुरू झाला. गबाजी पाडेकर, राजेंद्र कुंजीर, लक्ष्मण गटकळ, समाधान तांबे, शर्मिला खर्गे, आरती गटकळ, मंगेश डुंबरे आणि अध्यक्षीय भाषण व मनोगत सलीम पटेल वेक्त केले.जेष्ठ पत्रकार अनिल कातळे यांचे ” सुखी जीवनाचे रहस्य ” या विषयावर ४५ मिनिटे व्याख्यान आयोजित केले होते. अतिशय मार्मिक विनोदी व भावुक भाषेत विविध उदाहरणे देत अनिल कातळे यांनी सर्वानाच खुर्चीत खिळवून ठेवले. त्यांचा सत्कार बाळासाहेब वाळुंज , शायर सलीम पटेल व मान्यवरांच्या हस्ते शाल, पुस्तक देऊन करण्यात आला. व्यख्यानानंतर सुग्रास व रुचकर भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. मध्यंतरानंतर पुन्हा वर्ग सुरू झाला त्यात मनीषा कासवा, मंगेश डुंबरे व शांता रोकडे, शायर सलीम पटेल यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुन्हा उरलेल्या विद्यार्थी विद्यार्थानींनी आपापले मनोगत वेक्त करत असताना. आयुष्यात आलेले चढ उतार कडू गोड अनुभव सर्वाना शेअर केले. त्याच बरोबर भूतकाळात जाताना कोलेजमधील आठवणींना उजाळा देताना कोणी भावुक झाले तर कोणी त्या काळातील खोडकरपणा पुन्हा जिवंत केला. कार्यक्रमाचे नेटके आयोजन खेड, पुणे व पिंपरी चिंचवड करांनी केले त्याबद्दल सर्वांच्या वतीने शायर सलीम पटेल यांनी पुणेकरांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक उल्हास पानसरे यांनी केले तर प्रास्ताविक बाळासाहेब वाळूज व आभार प्रदर्शन पत्रकार रोहित खर्गे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणेकरांच्या वतीने उद्योजक उल्हास पानसरे, बाळासाहेब वाळुंज, सतीश थोरात, पांडुरंग शिंदे, आरती गटकळ, मनीषा कासवा, शर्मिला खर्गे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे