बेल्ह्यातील मॉडर्नच्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1 min read
बेल्हे दि.१४:- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) येथील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिंदमाता विद्यालय वडगाव चे माजी प्राचार्य जे.एल वाकचौरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आयुष्य जगावे असे आवाहन विद्यार्थांना केले.
तसेच रा.प.सबनीस स्कूल नारायणगाव चे उपप्राचार्य हनुमंत काळे यांनी विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी परीक्षांमध्ये पेपर लीहताना घ्यावयाची काळजी तसेच परीक्षेच्या काळात आरोग्य व अभ्यासाची उजळणी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, तुम्हींच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. अध्ययन कसे करावे, प्रश्नांची उत्तरे कशी लिहावी, मनन, चिंतन करावे, नोट्स काढाव्यात, आपली कृती यॊग्य वेळी पुर्ण झाली पाहिजे. यशासाठी नियोजन महत्वाचं करावे. निर्णयाची क्षमता बुद्धीत असते, तन,मन आणि बुद्धीचा विकास म्हणजे सर्वांगिण विकास तो झाला.
की जीवनातील सगळी वादळ झेलन्याची ताकद येते. प्रत्येक क्षण हा अध्ययनप्रण असतो. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून उज्ज्वल यश संपादित करावे. केजी पासून हे विद्यार्थी शाळेत शिकत होते. १२ च्या विद्यार्थ्यांनी कवितेच्या माध्यमातून आठवणींना उजाळा दिला तर १० वी च्या विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून आठवणींना उजाळा दिला.
१० वी १२ च्या विद्यार्थ्यांनी शाळेला तसेच शाळेतील सर्व शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांना, भेटवस्तू देण्यात आली. या वेळी रा.प.सबनीस स्कूल नारायणगाव चे उपप्राचार्य हनुमंत काळे, हिंदमाता विद्यालय वडगाव चे माजी प्राचार्य जे.एल वाकचौरे,मॉडर्न च्या प्राचार्या विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
१० वी च्या विद्यार्थ्यांची CBSE बोर्ड परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत असून परीक्षेसाठी माळशेज निकेतन चे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.