आदर्श पुरस्कार प्रदान प्राप्त मुख्याध्यापिका जयश्री सातकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार

1 min read

खेड दि.८:- खेड येथे पार पडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात सन २०२३/२४ च्या आदर्श शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहणे (ता. खेड) च्या मुख्याध्यापक आदर्श शिक्षिका जयश्री सातकर यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे औचित्य साधून डेहणे गावच्या वतीने ग्रामपंचायत व इतर शाखांच्या वतीने जयश्री सातकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश खाडे, तुकाराम भोकटे गुरुजी, अशोक कशाळे, नेत्रा हूरसाळे, अश्विनी हरसाळे,पूजा डोंगरे, कोरडे मॅडम, वंदना कशाळे, अंगणवाडी सेविका सोळसे, आरती वाजे, इत्यादी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेंदुर्ली शाळेचे अरूण आसवले उपस्थित होते. प्रास्ताविक आणि आभार डेहणे शाळेचे उपक्रमशील आदर्श शिक्षक दुलाजी तिटकारे सर यांनी मानले. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली, पूजा डोंगरे, हूरसाळे यांनी विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. देवेंद्र कोकाटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तुकाराम भोकटे यांनी अध्यक्षीय भाषणात शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे