NMMS परीक्षेत सरदार पटेल हायस्कूल च्या विद्यार्थांची बाजी ;१६ विद्यार्थी ठरले सारथी शिष्यवृत्ती पात्र
1 min readआणे दि.८:- आणे (ता.जुन्नर) येथील NMMS परीक्षेत सरदार पटेल हायस्कूल च्या विद्यार्थांनी बाजी मारली असून १६ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. इ.८ वी साठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात NMMS परीक्षा 2023-24 मध्ये विद्यालयाला उतुंग यश मिळाले आहे.
रविवार दि.२४ डिसें २०२३ रोजी झालेल्या NMMS परीक्षेत विद्यालयातील ३७ विद्यार्थी बसले. त्या विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १६ विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती प्रत्येकी रुपये ९६०० याप्रमाणे पाच वर्षांसाठी मिळणार असल्याची माहिती मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली.
NMMS परिक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना अध्यापक तुषार आहेर, अरूण बर्डे, विजय भणगे, शाकीर इनामदार यांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व अध्यापकांचे शाळा व्यवस्थापन व विकास समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तेजल संपत बेलकर, वैष्णवी विठ्ठल आहेर, सानिका सिद्धेश दाते, सान्वी बाळासाहेब दाते, रोशनी शंकर बेलकर, ओमकार पोपट आहेर, पूर्वा जयराम दाते, सारिका शिवराम बेलकर, साधना रंगनाथ दाते, हर्षवर्धन बबन गांडाळ, धीरज संतोष दाते, आयुष सुदर्शन उबाळे, सर्वेश किशोर आहेर, तेजस्वी लक्ष्मण गायखे,
सार्थक नवनाथ राळे, तुषार गेनभाऊ भोसले, सुजल मिनानाथ दाते या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. २०१४ पासून उत्तरोत्तर अधिकाधिक विद्यार्थी NMMS शिष्यवृत्ती पात्र ठरत आहेत व त्यायोगे स.प.हायस्कूल चे नाव उज्वल होत असल्याचे विद्यालयाचे जेष्ठ अध्यापक रविंद्र जाधव म्हणाले.