ओतूर परिसरात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; दोन शेळ्यां व करडू जागीच ठार
1 min readओतूर दि.३:- जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले थांबताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस हल्यांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. दिवसा हल्ले होत आहेत.ओतूर जवळील पानसरे पट (ता. जुन्नर) परिसरातील उत्तम गजानन पानसरे यांच्या राहत्या घराशेजारील मोकळ्या जागेत बांधलेल्या गोठयातील शेळ्यांवर भर दुपारी बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवार (दि. २) रोजी भरदुपारी घडली आहे. या हल्यात दोन शेळ्यांचे करडू जागीच ठार झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेले सात, आठ वर्षे या भागात बिबट्याची कायम दहशत राहिली आहे. दरम्यान, घटनेचा वन विभागाने पंचनामा केला आहे. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी विश्वनाथ बेले. सुधाकर गीते यांनी घटनास्थळी जावून पाहणी
करून घटनेचा विश्वनाथ बेले यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान या भागात पुन्हा बिबट्याने पशुधनावर हल्ले सुरू केल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सात, आठ वर्षांपासून या भागात बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे.