पुणे जिल्ह्यात शिवजयंतीला ‘ड्राय डे’ जाहीर करण्याची मागणी
1 min readपुणे, दि. ३:- स्वराज्याचे प्रणेते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी जिल्ह्यात दारू विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी शहरात शिवजयंती उत्सव साजरी करणाऱ्या मंडळांतर्फे महापालिका, तसेच पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली. या मिरवणुकीत स्पीकर्सच्या भिंतींऐवजी पारंपरिक वाद्यांचाच वापर करण्यात यावा, अशी मागणीही काही कार्यकर्त्यांनी करत यावेळी अभिनव पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याची विनंती प्रशासन, मंडळांना केले आहे. शिवजयंतीनिमित्त महापालिकेतर्फे आयोजित पालिका, पोलीस व शिवजयंती उत्सव कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप, पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रभारी नगरसचिव योगिता भोसले- निकम उपस्थित होते.