जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.२:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेसाठी मार्गदर्शन आयोजन करण्यात आले.
रविवार दि.४ रोजी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा होणार असल्याने शाळेमध्ये राज्य पुरस्कार विजेते सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाळेत सुरू असलेल्या पाढे पाठांतर, दप्तर मुक्त शनिवार, स्पेलिंग पाठांतर, मिशन बर्थडे इ.उपक्रमांची उपक्रमांचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन अध्यक्ष सुप्रिया बांगर व सर्व सदस्यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल गुरुजींचे आभार मानले. उपशिक्षक हरिदास घोडे यांनी सन्मान केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे