उद्यापासून ऑनलाइन मिळेल 10 वी परीक्षेचं हॉल तिकीट, असं करा डाऊनलोड..! प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी भरारी पथके..!

1 min read

पुणे दि.३०:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट उद्या म्हणजेच बुधवारपासून ऑनलाइन उपलब्ध करून दिले जणार असून विद्यार्थी 31 जानेवारीपासून आपलं हॉल तिकीट ऑनलाइन मिळवता येणार आहे.

इयत्ता दहावीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाऊनलोड कसे करावे?● सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in ला भेट द्या
● SSC परीक्षा निवडा.
● नवीन विंडो उघडेल.
● आपले यूजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
● आवश्यक असणारा तपशील प्रविष्ट करा.
● तपशील प्रविष्ट केलेल्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र आपल्या स्क्रिनवर दिसेल.● ‘डाऊनलोड’ या पर्यायावर क्लिक करा.
● प्रवेशपत्र डाऊनलोड करून सेव्ह करा.
● सेव्ह केलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट आऊट काढा.मंडळाने दिलेल्या ‘स्कूल लॉगिन’मध्ये हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध असेल. दहावीच्या परीक्षेसाठी सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहेत. हॉल तिकीट प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. तसेच त्या हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, म्हणून यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल.विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेची चिंता न करता, प्रश्नांचा सराव व नोट्‌स काढून त्याच्या अभ्यासावर भर दिल्यास परीक्षा सोपी जाईल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. दहावी-बारावीतील गुण म्हणजे आयुष्य नव्हे, हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. पालकांनीही अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नये. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप घेऊन पहाटेच्या सुमारास अभ्यास केल्यास तो लक्षात राहातो.काही ठळक वैशिष्ट्ये
– इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या कालावधीत
– इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २९ फेब्रुवारीपर्यंत
– इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चपर्यंत चालणार
– दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत.कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षेसाठी असणार आहेत. पूर्वी एकाच शाळेतील विद्यार्थी एकामागे एक यायचे आणि त्यातून कॉपी करून किंवा एकमेकांचे पाहून उत्तरे लिहिली जायची. आता हा प्रकार बंद होईल. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यावरच प्रश्नपत्रिका मिळेल, पण शेवटी १० मिनिटांचा वेळ जादा दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे बंधन असणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे