दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी डी.वाय.एस.पी; राज्यसेवा परीक्षेत चौथ्या प्रयत्नात मिळाले यश

1 min read

निमगाव सावा दि.२८:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थी दीपक किसन शेलार (मु. पो. शिरापूर, ता.पारनेर जि. अहमदनगर) राज्यसेवा परीक्षा डीवायएसपी 30 व्या रँकनी उत्तीर्ण झाला आहे.

आई वडील शेतकरी. सर्वसामान्य कुटुंबातले, शेती आणि मोलमजुरी करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यामध्ये दीपक ने मिळवलेले यश हे आदर्शवत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा उचाळे वस्ती शिरापूर येथे त्यानंतर माध्यमिक व

उच्च माध्यमिक शिक्षणानंतर सन 2015- 16 मध्ये दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे कला शाखेत प्रवेश घेऊन इतिहास विषयांमध्ये पदवीचे शिक्षण 2017 -18 मध्ये पूर्ण केले.

पदवीनंतर पुण्यामध्ये जाऊन राज्यसेवेची तयारी केली. विशेषत: कोणत्याही प्रकारचे क्लासेस न करता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नांमध्ये दुसऱ्या मुलाखतीनंतर यश प्राप्त केले. संस्थेचे संस्थापक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दीपक शेलार याचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

तसेच महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन असे उत्कृष्ट यश संपादन करण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, सर्व संचालक, प्राचार्य डॉ.छाया जाधव, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी दीपक शेलार मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे