खेड शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्रदान

1 min read

खेड दि.४:- खेड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे मानकरी केंद्र प्रमुख भरत लोखंडे नायफड केंद्र, जयश्री सातकर (शाळा डेहणे).

हिनाकौसर शाह (शाळा वांजाळे), धनराज अचवलकर (शाळा नायफड), भास्कर बुरसे (शाळा नायफड), बापू दराडे (शाळा सरेवाडी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती, शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश,

भौतिक सुविधांच्या बाबतीत यशस्वी, मार्गदर्शन भूमिका इ.पातळीवर मुल्यांकन करण्यात आले. यावेळी खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे व सर्व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे