व्हिजन इंटरनॅशनल स्कूल खामुंडीच्या विद्यार्थ्यांचा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग

1 min read

ओतूर दि.४:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, खामुंडी (ता.जुन्नर) या स्कूलचे विद्यार्थी सुदर्शन जितेंद्र डुंबरे, अंश राजू नलावडे, अदिती दीपक खेमनार, स्वरूप एकनाथ पाडेकर, आरुष किरण चौधरी, देवांश प्रफुल्ल जाधव, ऋषभ संपत खर्डे, मयुरेश पंकज डुंबरे.स्मरण अभिजीत हांडे, स्वरूप वैभव पानसरे, विश्वजीत सागर डुंबरे, जिया शहा व तुकाराम भिकाजी डुंबरे यांनी अखिल भारतीय विद्यापीठ परिषद पुणे आयोजित विवेकानंद मॅरेथॉन मध्ये ३ किलोमीटर रनिंग पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक व मेडल देण्यात आले. या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक अनिल बोर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सहभागी सर्व विद्यार्थी व पालक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे,मानद सचिव वैभव तांबे, खजिनदार मयूर ढमाले ,व्हिजन स्कूलच्या प्राचार्या प्रियांका जोंधळे तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे