पत्नी ने केला नवऱ्याला तब्बल ७ वेळा मारण्याचा प्रयत्न

1 min read

नाशिक दि.१:- नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. बायकोच नवऱ्याच्या जीवावर उठली आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नीने साथीदारांच्या मदतीनं कट रचत पतीला तब्बल ७ वेळा मारण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र यातून पतिदेव सुदैवाने बचावला.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बायकोच जीवावर उठल्याची घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिकच्या बोरगड परिसरात ही घटना घडली आहे. पतीनं संपत्ती हडपण्यासाठी पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे.पत्नीनं आधी पतीला बिअर पाजली, त्यानंतर त्याला सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान तीनं पतीचा गळा देखील आवळला. महिलेनं आपल्या दोन साथिदारांच्या मदतीनं आधी पतीचं तोंड उशिनं दाबलं, नंतर त्याचा गळाही आवळण्यात आला, त्यानंतर त्याला संर्पदंश करण्यात आला. या सर्वांमधून देखील पती वाचला आहे. त्याच्यावर सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्नीन बीअर पाजून संर्पदश केला, तसेच डोक्यात हेल्मेटनेही मारल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे