सीसीटिव्हीच्या आधारे आणे येथील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश
1 min read
आणे दि.३१:- जुन्नर तालुक्यातील आणे येथील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला अवघ्या दोन दिवसात यश आले आहे. या प्रकरणी एकजणास अटक करत ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेली माहिती अशी की, आणे येथे शनिवारी (दि.२७) मध्यरात्रीनंतर योगेश गांडाळ यांची आर्यन मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्याने विविध कंपन्यांचे एक लाख रुपये किंमतीचे सात मोबाईल चोरून नेले होते. गांडाळ यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी तपास करून सागर बबन मधे (वय २७ रा. गुन्हेवाडी ता. पारनेर, जि. नगर) या आरोपीला अटक केले आहे.या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अभिजित सावंत, पोलिस हवालदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले यांनी सुरू केला होता.
पथकाने दरम्यान गुन्हा हा सागर मधे व एका साथीदराने केल्याचे या पथकाला समजले. आरोपींचा शोध घेत असताना सागर मधे शिंदेवाडीत मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. शिंदेवाडी येथे या पथकाने सापळा लावून सागर मधे याला ताब्यात घेतले.
त्याचेकडे या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा साथीदार किरण नावजी जाधव (रा. भोसरमळा, गुन्हेवाडी ता. पारनेर) याचे मदतीने केल्याची कबुली दिली.दरम्यान त्याच्या ताब्यातून अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे चोरीतील चार मोबाइल जप्त केले.
त्यास अटक करत पुढील कार्यवाहीसाठी आळेफाटा पोलिसांचे ताब्यात दिले. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.सदर ची कारवाई ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो.नि. अविनाश शिळीमकर,पो.स.ई. अभिजित सावंत,
पो.हवा. दिपक साबळे,पो.हवा. राजू मोमीन,पो.ना. संदीप वारे,पो.कॉ. अक्षय नवले यांनी केली आहे.