वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
1 min readराजुरी दि.२०:- वित्त आयोग निधीमधून ग्रामपंचायतीना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत असतो. अनेक ग्रामपंचायतीना स्वउत्पानातून गरजा पूर्ण करताना कसरत करावी लागते मात्र वित्त आयोगातून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून ग्रामपंचायतीची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु असल्याचे मत सरपंच प्रिया हाडवळे यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत राजुरीने 15 वा वित्त आयोग निधीमधून खरेदी केलेल्या पाणी टँकर व ट्रॅक्टर ट्रॉली चा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. ग्रामपंचायतीने 15 वा वित्त आयोग निधीतून यापूर्वी ट्रॅक्टर, सक्षण मशीन,
स्वपर मशीन अशी अनेक साधने घेतल्यामुळे स्वच्छतेची कामे सहज करता आली ही साधने स्व उत्पन्नातून उपलब्ध करणे शक्य नव्हते. एकूणच वित्त आयोगाचा ग्रामविकासात मोलाचा सहभाग आहे.
लोकांर्पण सोहळ्याप्रसंगी सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके ग्रामपचायत सदस्य एम डी घंगाळे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, शाकीर चौगुले,
गौरव घंगाळे, रुपाली औटी, शीतल हाडवळे, मीना आवटे, सुप्रिया औटी, निर्मला हाडवळे, सुवर्णा गटकळ, राजश्री रायकर, किशोरी औटी, ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ व वरिष्ठ लिपिक नितीन औटी उपस्थित होते.