समर्थ मध्ये रस्ता सुरक्षा अभियान संपन्न; वेग आवरा,जीवन सावरा:- पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे
1 min read
बेल्हे दि.१८:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बेल्हे, समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ लॉ कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांचा ध्यास-ग्राम व शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती पर विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन राजुरी येथे १६ जानेवारी २०२४ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आलेले आहे.
दरम्यान महामार्ग सुरक्षा पथक मदत केंद्र आळेफाटा यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान २०२४ या विषयावर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आळेफाटा पोलीस स्टेशन मदत केंद्राचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, पोलीस हवालदार सचिन डोळस, जयवंत कोरडे व पोलीस कॉन्स्टेबल भीमाशंकर आहेर आणि त्यांचे संपूर्ण पथक यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधताना पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे म्हणाले की, आयुष्यामध्ये प्रत्येक बाबी मध्ये आपण रिटेक घेऊ शकतो परंतु अपघात घडला तर त्याला रिटेक नसतो.म्हणून अपघात होऊच नये यासाठी खबरदारी घ्यावी.
विद्यार्थ्यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट घालने बंधनकारक आहे.ट्रिपल सीट प्रवास करू नये.आपल्या वाहनाचा वेग मर्यादित असावा.पालकांनी देखील आपल्या पाल्याचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व लायसन मिळाल्यानंतरच दुचाकी अथवा चार चाकी गाडी चालवण्यास परवानगी द्यावी.
रस्त्यावर अपघात घडल्यास किमान अपघात ग्रस्त व्यक्तीला रस्त्यातून बाजूला घेणे व ॲम्बुलन्सला बोलावून तात्काळ हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी सहकार्य करावे.शाळा महाविद्यालयामध्ये जाताना वेळेच्या आधी घरातून निघावे.आपल्या वाहनाचा विमा वेळोवेळी काढून घेणे गरजेचे आहे.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमानसंदर्भात अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.आपल्या वाहनाचा वेग आवरा व आपले जीवन सावरा असा संदेश यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,प्रा.गणेश बोरचटे,प्रा.गौरी भोर,प्रा.अश्विनी खटिंग,प्रा.सचिन भालेराव,प्रा.सचिन शेळके,प्रा.रुपेश कांबळे आणि २५० रासेयो शिबिरार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे यांनी मांडले.