अयोध्येतील सोहळ्यासाठी बीजमाता राहीबाई पोपेरेंना निमंत्रण
1 min readअकोले दि.१८:- २२ तारखेला राम जन्मभूमी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातून निवडक मान्यवरांना या खास कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले आहे. बीजमाता राहीबाई पोपेरे यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमीत शेतकर्यांना सुखाचे दिवस येऊ देत व देशवासीयांचे ताट विषमुक्त होऊ दे, ही प्रार्थना समस्त शेतकर्यांसाठी प्रभू श्रीरामचरणी त्या करणार आहेत. होळी, दिवाळी, दसरा या सर्वच महत्त्वाच्या सणांना प्रभू श्रीरामाची प्रार्थना व परंपरागत गाणे आम्ही कायम गात असायचो, ही आठवण त्यांनी ताजी केली. या अद्वितीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान राहीबाई यांना मिळाल्यामुळे तालुक्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.