शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा भूमिपूजनानिमित्त आळे गावातील मुस्लीम बांधवांकडून पेढ्यांचे वाटप
1 min readआळेफाटा दि.१७:- शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारणीच्या संकल्पपूर्तीबद्दल आळे येथील मुस्लिम बांधवांनी मंगळवारी गावात पेढे वाटप केले. या वेळी मुस्लिम व हिंदू बांधवांनी परस्परांना अलिंगन देत शुभेच्छा दिल्या. हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन झाल्याबद्दल माजी आमदार शरद सोनावणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.आळे येथील मुस्लीम मावळा सादिक अत्तार यांनी गावातील मुस्लीम बांधवांच्या उपस्थित शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारणीच्या भूमिपूजनाच्या आनंदात पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी केली. माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतून पतळा उभारला जाणार असल्याने मुस्लीम बांधवानी सोनावणे यांना पेढे भरवत अलिंगन दिले. या वेळी हाजी पापा मोनीन, हाजी आरिफ मोमीन, रजाउद्दीन मोमीन, मन्सूर मोमीन, रशीद अत्तार, रहीम शेख, अशिफ शेख, मोबीन अत्तार, इरफान अत्तार, राजू चौगुले, जयवंत जंगम, विनोद भंडलकर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.“एक समाज म्हणून आणि एक धर्म म्हणूनही शिवाजी मुस्लिमांविरुद्ध कोणत्याच प्रकारचा द्वेष करत नव्हते,”. लष्कर आणि नौसेनेत सैनिकांच्या नियुक्तीसाठी धर्म हा निकष नव्हता आणि त्यातले एक तृतीयांश सैनिक मुस्लीम होते. जेव्हा शिवाजी आग्र्यात नजरकैदेत होते, तेव्हा तिथून पलायन करण्यासाठी ज्या दोघांनी त्यांना मदत केली होती. त्यांच्यात मदारी मेहतर नावाचे मुस्लीम होते. आम्हा मुस्लीम बांधवाना शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारणीच्या संकल्पपूर्तीबद्दल सर्वाधिक आनंद झाला आहे. असे मुस्लीम मावळा सादिक अत्तार यांनी सांगितले.