कोरठन खंडोबा यात्रेवर बेल्हे गावच्या मानाच्या काठी पालखीच्या मानकरी ग्रामस्थांचा बहिष्कार

1 min read

बेल्हे दि. १७:- अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा नवीन विश्वस्त मंडळाने गेल्या दोन वर्षापासून खंडित करून बेल्हे करांना झुगारून देऊन दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. कोरठन खंडोबा मुळ मंदीराचे पुरातन बांधकाम बेल्हे गावकऱ्यांनी केले असल्याचा शिलालेख मंदिरा मध्ये आहे. त्या नुसार बेल्हे करांचा आणि देवस्थानचा सुमारे ४५० वर्षांचा इतिहास आहे. त्या प्रमाणे बेल्हे करांना यात्रेला मान दिला जात नाही. सालाबाद प्रमाणे भरणाऱ्या कोरठन खंडोबा यात्रेवर बेल्हे येथील मानाच्या काठी पालखी मानकरी यांनी व बेल्हे ग्रामस्थांनी कोरठन यात्रेला काठी पालखी घेऊन न जाण्याचा निर्णय सर्वांनु मते घेण्यात आला आहे. असे काठी पालखी समितीचे अध्यक्ष राजेंद्र मटाले व सचिव संकल्प विश्वासराव यांनी सांगितले आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा बेल्हे ग्रामस्थांना शासकीय नियोजनाच्या बैठकीला निमंत्रण पत्र गेल्या दोन वर्षापासून प्रशासक व नवीन विश्वस्त मंडळ पाठवत नसल्यामुळे बेल्हे ग्रामस्थांना मध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी झालेल्या प्रशासकीय बैठकीला कोरठन येथे गावच्या वतीने कोणीही ग्रामस्थ व मानकरी उपस्थित राहिलेले नाहीत.
बुधवार दि.३ जानेवारी २०२४ रोजी ऐका वृत्तपत्रात विश्वस्त मंडळांने दिलेल्या चुकीच्या बातमीमुळे बेल्हे गावात संभ्रम निर्माण केला गेला आहे. प्रत्यक्षात गावातील कोणत्याही व्यक्ती बरोबर चर्चा झालेली नसल्याने बेल्हे गावात लोकांमध्ये कोरठन खंडोबा देवस्थानचे विश्वस्त मंडळा बद्दल तीव्र नाराजी आहे. त्यामुळे यात्रेसाठी मनाची काठी व पालखी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.ग्रामस्थांनी ही काठी व पालखी कळस रोडवरील खंडोबा देवाचे स्थान असलेल्या पाउतके या ठिकाणी घेऊन उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत गाव बैठक झाली असून बैठकीला गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ वाघ, विश्वनाथ डावखर, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकु डावखर गावचे उपसरपंच राजू पिंगट, विजय घोडके, सुनील आरोटे, ग्रामपंचायत सदस्य, ताराचंद मुलमुले काठी पालखी समितीचे उपाध्यक्ष, रमेश विश्वासराव तसेच सदस्य धोंडीबा पाबळे व नितीन विश्वासराव हे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे