श्रीमती इंदिरा गांधी हायस्कुल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पुजन
1 min readरानमळा दि.१२:- श्रीमती इंदिरा गांधी हायस्कुल, रानमळा (ता. जुन्नर) या ठिकाणी शुक्रवार दि.12 रोजी “राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद” यांच्या जयंती निमित्त त्यांचे प्रतिमापुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जगताप एस. डी हे होते. विद्यालयातील विद्यार्थी व ज्येष्ठ शिक्षिका माया माळवे व जयश्री थोरात यांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या महत्त्वपूर्ण कार्याविषयी माहिती सांगितली. सदर कार्यक्रमास विद्यालयातील उपशिक्षिका विद्या औटी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालुंजकर यांनी केले. तर थोरात मॅडम यांनी आभार व्यक्त केले.