श्री पांडुरंग वाचनालयात राजमाता जिजाऊ व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

1 min read

निमगाव सावा दि.१२:- श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा या ठिकाणी राजमाता जिजाऊ व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोपान मुंढे (अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. नंतर वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य बबन जिजाबा गाडगे, सुनील शेळके टेलर, नजीर चांदभाई पटेल, सुजित खाडे, मयूर गाडगे यांनी प्रतिमांचे पूजन केले. या कार्यक्रमाला सोपान मुंडे अध्यक्ष अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस निमगाव सावा, बबन जिजाबा गाडगे ज्येष्ठ सदस्य वाचनालय, नजीर पटेल सामाजिक कार्यकर्ते, सुनील शेळके. शकील पटेल, सुजित खाडे, मयूर गाडगे, संतोष बोऱ्हाडे, अर्जुन गांजवे, आरिफ भाई मोमीन, तानाजी डावखर, बाळासाहेब थिटे, छबन आल्हाट, ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे यांनी सर्वांचे आभार मानले व चहापान झाल्यावर कार्यक्रम संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे