सह्याद्री पब्लिक स्कूल मध्ये पारंपारिक वेशभूषा स्पर्धा संपन्न
1 min readराजुरी दि.१३:-सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल (राजुरी ता. जुन्नर) येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या रिजवाना शेख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले. राजमाता जिजाऊ यांची व्यक्तिरेखा साकारलेली सान्वी बोरचटे व स्वामी विवेकानंद यांची व्यक्तिरेखा साकारलेला विद्यार्थी नुमान चौगुले यांनी या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. शाळेच्या शिक्षिका तेजस्विनी कोल्हे व गायत्री पिंगट यांनी विद्यार्थ्यांना या महान व्यक्तिमत्त्वाच्या आदर्शावर सर्वांनी चालावे असे आवाहन केले. युवक दिनाचे औचित्य साधून इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे देखील आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी व त्यांच्या वर्गशिक्षकांनी विविध राज्यांच्या पारंपारिक वेशभूषा साकारून विविधतेतून एकता स्पष्ट केली.
यात इ १ ली महाराष्ट्र, इ २ री गुजरात, इ ३री गोवा, इ ४ थी केरळ, इ .५ वी पंजाब, इ ६ वी राजस्थान, इ ७वी कर्नाटक, इ ८ वी पश्चिम बंगाल आदी. राज्यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, पालक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका तृप्ती हाडवळे यांनी केले तर तेजस्विनी कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले.