स्थानिक व्यवसायिक वाहन धारकांना उद्या पासून टोल; डुंबरवाडी टोलनाका प्रशासनाचा फतवा
1 min readपिंपरी पेंढार दि.१०:- नगर- कल्याण महामार्गावरील डुंबरवाडी (ता. जुन्नर) टोलनाक्यावर स्थानिक व्यवसायीक वाहनांना सवलत देण्यात येत होती
मात्र दि. ११ जानेवारी पासून कार सोडून सर्व प्रकारच्या व्यवसायिक वाहनांना मासिक पास घ्यावा लागणार असून पासद्वारे टोल भरावा लागेल अशी माहिती डुंबरवाडी टोलनाक्याचे मुख्य व्यवस्थापक संदीप कंट्रक्षण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
इतर सर्व प्रकारच्या सर्व वाहानांना वेगवेगळा दर आकारण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक नागरिकांचे डुप्लिकेट आधारकार्ड, रेशनिंग कार्ड,
सातबारा अशी कागद पत्र बनवून इतर जिल्ह्यातील अनेक वाहन चालक टोल भरण्याची टाळाटाळ करीत असून वाद घालत असल्याची बाब समोर आल्यामुळे टोल प्रशासनाला हा नव्याने नियम करावा लागत असल्याचे मुख्य व्यवस्थापकांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
तरी सर्व वाहन चालक- मालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन टोल प्रशासनाने केले आहे. जुन्नर तालुक्यातील स्थानिक वाहन चालकांना आपले आधारकार्ड दाखविल्यानंतर डुंबरवाडी टोलनाक्यावर सूट दिली जात होती तीच पद्धत योग्य आहे.
लोकांनी पण आपले डुब्लिकेट आधार कार्ड शेजारील तालुक्यातील लोकांना दिले नाही पाहिजे. मासिक पास घेणं सर्वांना शक्य होणार नाही अन्यथा तो फ्री दिला पाहिजे असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.