पुणे येथील यझाकी कोअर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये ओतूरच्या शरदचंद्र पवार कॉलेजच्या ८ विद्यार्थ्यांची निवड
1 min readओतूर दि.३१:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतूर व महाविद्यालय ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने बुधवार दि.२७ रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन मुलाखतीमधून यझाकी कंपनीमध्ये ८ विद्यार्थ्यांची निवड झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.यु. खरात यांनी दिली.यझाकी ही कंपनी आंतरराष्ट्रीय कंपनी असून ती पुणे येथे दहा एकर परिसरात वसलेली आहे. तसेच या कंपनीच्या १८ वेगवेगळ्या देशांमध्ये शाखाविस्तार असून ती जापनीज कोअर इलेक्ट्रॉनिक्स संपूर्ण स्वयंचलित अशा पद्धतीची कंपनी आहे. त्यामध्ये मेकॅनिकल विभागाचे तुषार पवार, अण्णासाहेब ताकभाते, अक्षय डुंबरे या ३ विद्यार्थी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन्स विभागाचे तेजस शिरसाट, सालकुदिन क्वाझी, शंकर शिंगणे, विशाल काकडे, सुरज खिलारी या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली.यझाकी कंपनीमध्ये या ८ विद्यार्थ्यांची निवड श्रीयुत महेश जाधव (सिनीअर मॅनेजर यझाकी) व सुमित चिंचकर (एच आर यझाकी) यांनी मुलाखती घेऊन केली गेली.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, मानद सचिव वैभव तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.यु खरात, संगणक विभागप्रमुख डॉ सुनील खताळ. महाविद्यालय प्लेसमेंट अधिकारी व मेकॅनिकल विभागप्रमुख प्राध्यापक सचिन जाधव, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉप्युलिकेशन विभागप्रमुख प्राध्यापक नीता बाणखेले, प्रथम वर्ष समन्वयक प्राध्यापक सिद्धार्थ पानसरे, कार्यालय अधिक्षक विशाल बेनके, ग्रंथपाल शामराव बढे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.