आळेफाटा तलाठी कार्यालयाची चोरी; ग्रामस्थ आक्रमक

1 min read

आळेफाटा दि.१०:- तलाठी कार्यालय वडगाव आनंद या तलाठी कार्यालयाच्या अखातारीत सुरुवातीपासूनच मौजे वडगाव आनंद, मौजे पादिरवाडी व मौजे आळेफाटा हि गावे समाविष्ट असून महसूल विभागाने नागरिकांना अंधारात ठेवत सन २०१७ या वर्षी मौजे आळेफाटा या महसुली गावाचे तलाठी कार्यालय गावातील एकही नागरिकाला माहिती न होता. सदर गावाचे तलाठी सजा मौजे चाळकवाडी या महसुली गावाला जोडत मौजे चाळकवाडी, मौजे आळेफाटा व मौजे भटकळवाडी या तीन गावांसाठी मौजे चाळकवाडी या ठिकाणी मौजे आळेफाटा महसुली गाव जोडले गेले आहे.या विचित्र प्रकारामुळे वडगाव आनंद ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या मौजे आळेफाटा या गावातील शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात असंतुष्ट तसेच नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत वडगाव आनंद या कार्यालयाच्या इमारतीत तलाठी कार्यालय कार्यरत असून याच कार्यालयातून गेली अनेक वर्षे मौजे वडगाव आनंद, मौजे आळेफाटा, व मौजे पादीरवाडी या तीनही गावांचा महसुली कारभार चालू असून मौजे आळेफाटा वडगाव आनंद तलाठी कार्यालयापासून तोडण्यासाठी जी जाहीर अधिसूचना व जाहीर दिवंडी या कार्यालयाने जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु जाहीर दिवंडी न देता ग्रामपंचायत वडगाव आनंद कार्यक्षेत्रातील नागरिकांचा विश्वासघात करत महसूल विभागाने जाहीर अधिसूचना व दिवंडी दिली, असे भासवत शासन दरबारी असणारी कार्यप्रणाली पूर्ण केली आहे. याचा परिणाम असा झाला आहे मौजे आळेफाटा या गावचा तलाठी सजा कार्यालय मौजे चाळकवाडी या ठिकाणी निर्माण होऊन आळेफाटा हे महसुली गाव त्या चाळकवाडी सजाला जोडण्यात काही नेते मंडळी यशस्वी झालेली आहेत. मुळात ग्रामपंचायत वडगाव आनंद हे गाव पूर्वी एकाच मौजे वडगाव भिकार या नावाने होते, गाव विभाजनानंतर मौजे वडगाव आनंद, मौजे आळेफाटा, व मौजे पादीरवाडी अशी तीन गावे झाली असली तरी तीनही गावात शेतजमीन असणारे अनेक शेतकरी आपणास दिसून येत आहेत, या तलाठी सजा कार्यालय विभागानेचा सर्वात जास्त फटका हा या शेतकरी बांधवाना होणार आहे. त्यामुळे या प्रकाराला विरोध करणेकामी ग्रामपंचायत वडगाव आनंद या गावाच्या गाव कारभारी मंडळींनी सरपंच, उपसरपंच, व सदस्य यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते, त्यात मोठ्या प्रमाणात नागरिक असंतुष्ट असलेमुळे सभा वादळी न होता अतिशय विचारात्मक झाली असून, या सभेला खरे अर्थाने संबोधित करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते डी.बी.वाळूंज, वकील भानुदास गडगे. अनंत चौगुले, नवनाथ वाळूंज, सचिन वाळूंज, कैलास वाळूंज, भगीरथ गडगे, जालिंदर पादीर, गणेश वाघमारे, चंद्रकांत देवकर, सुरेश देवकर, प्रशांत देवकर, सुरेश शिंदे, नारायण वाळूंज आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.या सभेला संबोधित करताना सामाजिक कार्यकर्ते डी.बी.वाळूंज यांनी तलाठी कार्यालय वडगाव आनंद या कार्यालयात समाविष्ट असणारी मौजे वडगाव आनंद. मौजे पादीरवाडी व मौजे आळेफाटा या गावांची सन २०११ च्या जनगणनेनुसार असणारी लोकसंख्या प्रामुख्याने तसेच अनुक्रमे २४८४, ९९१ व ३२४८ म्हणजे एकूण ६७२३ लोकसंख्या तसेच महसुली क्षेत्रफळ १६०७.९८ हेक्टर असल्याची माहिती देत मौजे चाळकवाडी व मौजे भटकळवाडी या दोन गावांची सन २०११ च्या जनगणनेनुसार असणारी लोकसंख्या प्रामुख्याने तसेच अनुक्रमे ३६२७ व २५४९ महणजे. एकूण ७१६७ असून तसेच महसुली क्षेत्रफळ १५६७.६७ हेक्टर असल्याची माहिती दिली. तसेच आळेफाटा हे महसुली गाव मौजे चाळकवाडी या गावाला जोडल्यास तलाठी कार्यालय वडगाव आनंद या कार्यालयाची लोकसंख्या ३४७५ तर महसुली क्षेत्रफळ १२५१.०८ अशी होणार आहे याउलट तलाठी कार्यालय मौजे चाळकवाडी या गावची होणारी लोकसंख्य ९४२४ तर महसुली क्षेत्रफळ १९२१.५७ हेक्टर होणार आहे. या चुकीच्या बदलाने विनाकारण नागरिक तसेच शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय करत शासनदरबारी चुकीची माहिती सादर केलेमुळे गरज नसताना देखील आळेफाटा तलाठी सजा चाळकवाडी या गावाला जोडला जात आहे, याबद्दल या बाबीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन जाहीर निषेध केला आहे. कोणत्याही किमतीला मौजे आळेफाटा या महसुली गावाचे तलाठी कार्यालय मौजे वडगाव आनंद या ठिकाणी असणाऱ्या तलाठी कार्यालयातच राहणार व ठेवणार या भूमिकेवर शेतकरी बांधव ठाम आहेत.
या सभेतून उच्च न्यायालयात अपील दाखल करणे हा पर्याय निवडला गेला असून ग्रामपंचायत कार्यकारिणीला सर्व अधिकार व खर्च करण्याचे अधिकार ग्रामस्थांनी दिले आहेत. या सभेला सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच ऋषी गडगे, सदस्य गणेश भुजबळ, प्रफुल इथापे, संदीप गडगे, संतोष पादिर, गोरक्ष देवकर, सोमनाथ गडगे तसेच सदस्य वैशाली देवकर, अल्पना देवकर, कल्पना पादिर, अश्विनी चौगुले, अर्चना काशिकेदार, वंदना शिंदे, शोभा शिंदे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप खिल्लारी आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे