जिल्हा परिषद शाळा बांगरवाडीचे क्रिडा स्पर्धेत दैदिप्यमान यश
1 min readखेड दि.८:- मांजरेवाडी विद्यालय (ता. खेड) येथे सोमवार दि.८ रोजी झालेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांगरवाडी शाळेच्या अदिती लांघी या विद्यार्थ्नीने ५० मीटर धावणे वैयक्तिक क्रिडा स्पर्धेत तालुका पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला. यासाठी खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे, नायफड केंद्राचे केंद्र प्रमुख भरत लोखंडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका नाटे व बांगरवाडी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांनी मार्गदर्शन केले.