समर्थच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश
1 min readबेल्हे दि.८:- पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व मेळावा सन २०२३-२४ समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच संपन्न झाले.या प्रदर्शनामध्ये समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ गुरुकुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने व समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केल्याची माहिती गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.निकाल पुढीलप्रमाणे:प्रकल्प स्पर्धा:निम्न प्राथमिक गट-इयत्ता पहिली ते पाचवीप्रथम क्रमांक-आरोही साबळे (समर्थ गुरुकुल बेल्हे)तृतीय क्रमांक-श्रीनिका शेळके (समर्थ गुरुकुल बेल्हे)माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावी बिगर आदिवासी:प्रथम क्रमांक-सिद्धसेन अनंत (समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे)शैक्षणिक प्रतिकृती-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गट:
प्रथम क्रमांक-विनोद चौधरी (समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे)
संगणकीय सादरीकरण स्पर्धा:प्राथमिक गट-५ वी ते ८ वी द्वितीय क्रमांक-प्रगती औटी,प्रांजल दाते (समर्थ गुरुकुल बेल्हे)माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावी द्वितीय क्रमांक-सार्थक आहेर(समर्थ गुरुकुल बेल्हे)भित्तीपत्रक स्पर्धा:प्राथमिक गट-इयत्ता पाचवी ते आठवीउत्तेजनार्थ-समृद्धी शेळके (समर्थ गुरुकुल बेल्हे)माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावीउत्तेजनार्थ-सानिया पोपळघट (समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे)वक्तृत्व स्पर्धा:माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावीद्वितीय क्रमांक-सार्थक आहेर (समर्थ गुरुकुल बेल्हे)सदर विद्यार्थ्यांना समर्थ गुरुकुलच्या प्रिया कडूसकर, कोमल भोर, अक्षदा गुंजाळ, प्रतीक्षा पटाडे, रूपाली भांबेरे, गौरी कांबळे, विशाखा शिंदे, कविता ठुबे, स्नेहल ढोले, दिप्ती चव्हाण यांनी तर समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या राजेंद्र नवले, शुभांगी सोलसे यांनी मार्गदर्शन केले.या विद्यार्थ्यांना लखनऊ उत्तरप्रदेश विद्यापीठाचे माजी कुलगुरू व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे, त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, प्रसिद्ध सर्पतज्ञ डॉ.सदानंद राऊत, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.