बेल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळेत आनंदी आठवडा बाजाराचे अयोजन; विद्यार्थांनी केली २० हजार रुपयांची उलाढाल
1 min read
बेल्हे दि.७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेत आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले. पुणे जिल्ह्यामध्ये बेल्हे हे बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवहाराचे खूप चांगले ज्ञान आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंदी आठवड्या बाजाराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलांनी अनेक प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. त्यासोबत विविध प्रकारची फळे, खाऊ गल्ली, कडधान्य, किरकोळ विक्रीच्या वस्तू बाजारामध्ये आणल्या होत्या.पालकांनी बाजाराला उत्कृष्ट प्रतिसाद देत आनंदी बाजारामध्ये सहभाग घेत बाजारात खरेदी केली. सर्वांच्या सहकार्यामुळे बाजारामध्ये वीस हजार रुपयांची उलाढाल झाली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर, उपाध्यक्ष सोहेल बेपारी सदस्य दादाभाऊ मुलमुले, शेखर पिंगट, गायत्री भालेराव, वैशाली मटाले, शितल गुंजाळ, मनीषा बांगर इ. सर्वच सदस्य या वेळेस उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांनी लहान मुला- मुलींचे कौतुक केले. इतर वेळी आपल्या आईवडिलांबरोबर बाजार आणण्यासाठी जाणारे बालचमु स्वतः वस्तूंची देवाण-घेवाण करत होते व व्यवस्थित पैशाचा हिशोब करत होते, वर्गात मिळविलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात अंगीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याजोगे होते. हे पाहून शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी, पालकांनी समाधान व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक मीरा बेलकर, उपशिक्षिका सुवर्णा गाढवे, कविता सहाणे, प्रवीना नायकोडी, योगिता जाधव, सूषमा गाडेकर, संतोष डुकरे , हरिदास घोडे, अंजना चौरे या सर्व शिक्षकांनी या आनंदी बाजाराचे नियोजन केलं होते.