श्री जे.आर.गुंजाळ स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रामायण ठरले खास आकर्षण

1 min read

आळेफाटा दि.७:- आळेफाटा येथील ओम चैतन्य फाउंडेशन संचलित श्री जे.आर.गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (ता.जुन्नर) येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदकुमार सूर्यवंशी अध्यक्ष जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण, नंदकिशोर भाटे अध्यक्ष अथर्व फाउंडेशन मुंबई. सुधाकर मलिक एज्युकेशनल मॅनेजर आत्मा मलिक, कोकमठाण, प्रशांत खिलारी आय टी हेड, मंदार आठले ॲडव्हायझर अथर्व फाउंडेशन, डॉ. प्रदीप गुंजाळ, सेक्रेटरी मीना गुंजाळ, डॉ. पूजा भालेकर, डॉ. हांडे, गोपीनाथ कुटे, डॉ. पंजाब कथे, सुभाष लोंढे, श्री. जे.आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज चे मुख्याध्यापक सतीश पाटील,उपमुख्याध्यापक विठ्ठल म्हस्के, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, गोंधळ गीत, कोळीगीत, शेतकरी नृत्य, देशभक्तीपर गीते, पारंपारिक गीते, आदिवासी नृत्य, आदी गीतांवर नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे खास आकर्षण रामायण ठरले. आपल्या पाल्याला मोबाईल पासून दूर ठेवण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी पालकांना दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंदकुमार सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉ. प्रदीप गुंजाळ यांनी केला. यावेळी खूप मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे नियोजन मुख्याध्यापक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नमिता दांगट, सचिन बाम्हणे, विठ्ठल म्हस्के, भावना पवळे, संतोष भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता लेंडे, विष्णू भोसले यांनी व विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या सरते शेवटी आभार प्रदर्शन शबाना जमादार यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे