बेल्हे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात १२३७ विद्यार्थ्यांचा सहभाग

1 min read

बेल्हे दि.५:- पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व मेळावा सन २०२३-२४ समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच संपन्न झाले.या प्रदर्शनात प्रकल्प स्पर्धेसोबतच वक्तृत्व स्पर्धा, भित्तिपत्रक स्पर्धा, संगणकीय सादरीकरण स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा, कौन बनेगा विज्ञानपती या स्पर्धामध्ये तालुक्यातील जवळपास १२३७ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.पारितोषिक वितरण समारंभ लखनऊ उत्तरप्रदेश विद्यापीठाचे माजी कुलगुरू व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे. त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, प्रसिद्ध सर्पतज्ञ डॉ.सदानंद राऊत,संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,सारिका शेळके,प्राचार्या वैशाली आहेर.गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे.जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघांचे अध्यक्ष रतिलाल बाबेल,गणित अध्यापक संघांचे अध्यक्ष प्रविण ताजने,मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष तबाजी वागदरे,एच पी नरसुडे,सतिश सगर,सुनील रोकडे,राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे म्हणाले की,यश मिळवायचे असेल तर आपल्या ठिकाणी असलेली बुद्धिमत्ता,महत्वाकांक्षा आणि आपल्या व्यवसायाबद्दल अभिमान या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.या प्रदर्शनाचा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा होता.त्याला अनुसरून प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक,तसेच आदिवासी,बिगर आदिवासी,दिव्यांग आदी विविध गटातील विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक शैक्षणिक प्रतिकृतींसह प्रकल्प सादर केले होते.यामधून गटनिहाय काही शैक्षणिक प्रकल्पांची जिल्हास्तरावर निवड केली आहे.यामधील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे गटनिहाय शैक्षणिक प्रकल्प पुढीलप्रमाणे:प्रकल्प स्पर्धा:निम्न प्राथमिक गट-इयत्ता पहिली ते पाचवीप्रथम क्रमांक-आरोही साबळे (समर्थ गुरुकुल बेल्हे)द्वितीय क्रमांक-वेदांत निघोजकर (श्रीमती रे.बा.देवकर विद्यालय,वडगाव आनंद)तृतीय क्रमांक-श्रीनिका शेळके (समर्थ गुरुकुल बेल्हे)
प्राथमिक गट-इयत्ता सहावी ते आठवी बिगर आदिवासी
प्रथम क्रमांक-मयुरी काकडे (श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार)द्वितीय क्रमांक-भावेश पाटील (श्री गाडगे महाराज विद्यालय ओतूर)
तृतीय क्रमांक-अवनीज जगदाळे (श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कुल नारायणगाव )प्राथमिक गट-इयत्ता सहावी ते आठवी आदिवासी
प्रथम क्रमांक-ईश्वरी कोकणे (संत गाडगे महाराज विद्यानिकेतन पिंपळगाव जोगा)द्वितीय क्रमांक-गौरी बगाड (न्यू इंग्लिश स्कुल आंबोली)प्राथमिक गट-इयत्ता सहावी ते आठवी दिव्यांगप्रथम क्रमांक-सारिका बेलकर (सरदार पटेल हायस्कूल आणे)माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावी बिगर आदिवासी
प्रथम क्रमांक-सिद्धसेन अनंत (समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे)द्वितीय क्रमांक-जीवन कदम (रा प सबनीस विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज नारायणगाव)तृतीय क्रमांक-स्वयम विरनक (शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर)माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावी आदिवासीप्रथम क्रमांक-राजविनी हांडे (संत गाडगे महाराज विद्यानिकेतन पिंपळगाव जोगा)
द्वितीय क्रमांक-आदित्य लोखंडे(भाऊसाहेब बोरा आणे माळशेज माध्यमिक विद्यालय, मढ)माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावी दिव्यांगप्रथम क्रमांक-चिरायू कसबे (सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी)द्वितीय क्रमांक-सार्थक देशपांडे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर)शैक्षणिक प्रतिकृती-प्राथमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक-निलेश ढवळे (जि प प्राथमिक शाळा धनगरवाडी)द्वितीय क्रमांक-सागर आवारी(जि प प्राथमिक शाळा कालदरे)शैक्षणिक प्रतिकृती-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटप्रथम क्रमांक-विनोद चौधरी (समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे)द्वितीय क्रमांक-तुषार आहेर (सरदार पटेल हायस्कूल आणे)शैक्षणिक प्रतिकृती-प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गटप्रथम क्रमांक-चंद्रकांत घाडगे (न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी कांदळी)द्वितीय क्रमांक-संदीप शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे)संगणकीय सादरीकरण स्पर्धा प्राथमिक गट-५ वी ते ८ वी प्रथम क्रमांक-समृद्धी आरुडे (जि. प. शाळा साकोरी)
द्वितीय क्रमांक-प्रगती औटी,प्रांजल दाते (समर्थ गुरुकुल बेल्हे)तृतीय क्रमांक-आदित्य ढोरे (शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कुल जुन्नर )माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावी प्रथम क्रमांक-सई तांबे (चैतन्य विद्यालय ओतूर)द्वितीय क्रमांक-सार्थक आहेर(समर्थ गुरुकुल बेल्हे)तृतीय क्रमांक-पराग आहेर (विद्या विकास मंदिर राजुरी)विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धामाध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावीप्रथम क्रमांक-प्रतीक पानसरे, पृथ्वीराज औटी (विद्या विकास मंदिर राजुरी)द्वितीय क्रमांक-विघ्नेश डुकरे,यश तिकोणे (मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे)तृतीय क्रमांक-समृद्धी माने,आयुष काळे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर)भित्तीपत्रक स्पर्धाप्राथमिक गट-इयत्ता पाचवी ते आठवीप्रथम क्रमांक-भक्ती नलावडे (शिवनेरी विद्यालय धोलवड)द्वितीय क्रमांक-विपुल पंडित (सावित्रीबाई फुले विद्यालय ओतूर)तृतीय क्रमांक-युवराज क्षीरसागर (ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल आळे)उत्तेजनार्थ-समृद्धी शेळके (समर्थ गुरुकुल बेल्हे)उत्तेजनार्थ अनुराधा वाव्हळ (रा प सबनीस विद्यालय नारायणगाव)माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावीप्रथम क्रमांक-मायावती सुतार (शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर)द्वितीय क्रमांक-सेजल राऊत (श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज)तृतीय क्रमांक-सिद्धार्थ भोर (श्री विघ्नहर विद्यालय ओझर)उत्तेजनार्थ-शर्वरी भांबेरे (मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल बेल्हे)उत्तेजनार्थ-सानिया पोपळघट (समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे)वक्तृत्व स्पर्धाप्राथमिक गट-इयत्ता पाचवी ते आठवीप्रथम क्रमांक-वेदांती येवले (महात्मा गांधी हायस्कूल पारगाव)द्वितीय क्रमांक-स्वराज भोर (अनंतराव कुलकर्णी हायस्कूल नारायणगाव)
तृतीय क्रमांक-अवनी काशीद (शंकरराव बुट्टे पाटील हायस्कूल जुन्नर)माध्यमिक व उच्च माध्यमिक गट-इयत्ता नववी ते बारावी
प्रथम क्रमांक-तेजस्वी बेळे (शंकरराव बुट्टे पाटील जुन्नर)
द्वितीय क्रमांक-सार्थक आहेर (समर्थ गुरुकुल बेल्हे)
तृतीय क्रमांक-पराग आहेर (विद्या विकास मंदिर राजुरी)
वक्तृत्व स्पर्धा शिक्षक गट-प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय प्रथम क्रमांक-मारुती साबळे (जिल्हा परिषद शाळा चिंचोली)द्वितीय क्रमांक-मोनिका घोलप (गाडगे महाराज इंग्लिश मीडियम स्कूल)तृतीय क्रमांक-मच्छिंद्र लांडगे(ज्ञानमंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळे)मान्यवरांच्या हस्ते सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी समर्थ आयटी आय विद्यार्थीनिर्मित टाकाऊ पासून उपयुक्त वस्तू निर्मिती प्रदर्शन, आयुकामार्फत विज्ञान वाहिनी,अगस्त्या फाउंडेशन मार्फत विज्ञान खेळणी प्रात्यक्षिक, विज्ञानातील चमत्कार,गणितीय गमतीजमती,अंधश्रद्धा निर्मूलनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी विज्ञान व गणित अध्यापक संघ तसेच प्रा.एच पी नरसुडे,प्रा.संजय कंधारे,प्रा.प्रदीप गाडेकर,प्रा.संतोष पोटे,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक प्रा.रतिलाल बाबेल यांनी तर आभार प्रा.एच पी नरसुडे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे