दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
1 min readनिमगाव सावा दि.५:- दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निमगाव सावा येथे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारताची पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत ब्रिटिश राजवटीत भारतीय महिलांना हक्क मिळवून देण्यास त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जाती व लिंगावर आधारित भेदभाव व अन्याय दूर करण्यासाठी त्या आयुष्यभर झगडल्या. अशा शब्दात प्राचार्या डॉ. छाया जाधव यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंची धगधगती जीवनगाथा मांडली.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निलम गायकवाड व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहूल सरोदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.