कौतुकास्पद! ‘नॅशनल लेव्हल चित्रकला स्पर्धेत’ साकोरीच्या विद्यानिकेतन स्कूलला ७० सुवर्ण पदके
1 min readसाकोरी दि.४:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी व विद्यानिकेतन पि. एम हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, साकोरी (ता.जुन्नर) येथील विद्यार्थांनी चित्रकला स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन केले आहे. विदयार्थ्यानी आपल्या चिमुकल्या हातांनी वेगवेगळ्या रंगांची उधळण करून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी चांगला प्रतिसाद नोंदविला. विद्यानिकेतन संकुलाचे नाव खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे. यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरन स्पर्धा, कोलाज स्पर्धा, कार्टून मेकिंग स्पर्धा, ग्रीटिंग कार्ड स्पर्धा, टॅटू मेकिंग स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा यामध्ये ८० विदयार्थ्याची इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रांगोत्सव सिलिब्रेशन मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी व पि. एम हायस्कूल व ज्यू. कॉलेज, साकोरी येथील ३५० विदयार्थ्यानी सहभाग घेतला होता. त्यातील ८० विद्यार्थ्यानी नॅशनल लेव्हल चित्रकला स्पर्धेमध्ये भरघोस बक्षिसे मिळविलेले आहेत. त्यात किड्स स्केट स्कुटर व ट्रॉफी -1, कलर सेट व गोल्ड मेडल -1, आर्ट मेरिट अवार्ड व ट्रॉफी -2, गोल्ड मेडल -70, ब्रांन्झ मिडल -10, ज्यूनिअर सिनिअर सुपर गिफ्ट -3, सरप्राईज गिफ्ट -2 व या सर्व विदयार्थ्याची इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ज्या विद्यार्थांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यांना कलाशिक्षक विनोद उघडे, प्राथमिक विभागच्या प्राचार्या रुपाली भालेराव, माध्यमिक विभागाचे प्राचार्य अमोल जाधव व पी. एम हायस्कूल विभागाच्या प्राचार्या सुनिता शेगर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थांचे संस्थापक पांडुरंग साळवे यांनी अभिनंदन केले.