सावित्रीमाई फुले जयंती व बालिका दिन डॉ. कदम गुरुकुल मध्ये उत्साहात साजरा
1 min read
इंदापूर दि.४:- आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान इंदापूर आणि क्रेडाई इंदापूर यांच्यावतीने सावित्रीमाई फुले जयंती व बालिका दिनाच्या निमित्ताने डॉ.कदम गुरुकुल मधील छत्रपती संभाजी नगर (ता.इंदापूर) या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा 14 वर्ष वयोगट मुले आणि मुली दोन्ही संघातील विजयी खेळाडू. प्रशिक्षक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान इंदापूर आणि क्रेडाई इंदापूर यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी क्रेडाई इंदापूर चे अध्यक्ष संजय भोंग, आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान इंदापूरचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, वसंतराव माळुंजकर संस्थापक अध्यक्ष क्रेडाई, विशाल दादा बोंद्रे डायरेक्टर क्रेडाई यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य सांगितले.
तसेच डॉ. कदम गुरुकुल मध्ये आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाचा आज दुसरा दिवस हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संदेश शहा आणि वसंतराव माळुंजकर यांच्या शुभहस्ते करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ. कदम गुरुकुल च्या शैक्षणिक संचालिका डॉ.सविता कदम, प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूल मॅनेजर संदीप जगताप यांनी केले.