विद्यानिकेतनच्या चिमुकल्या मुलींनी दिला सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा

1 min read

साकोरी दि.३:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, पी.एम हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज साकोरी (ता.जुन्नर) येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.

या वेळी चिमुकल्या विद्यार्थिनीं क्रांतीज्योती सावित्रीबाई ची वेशभूषा परिधान केली होती. या छोट्या सावित्रीबाई च्या वेशातील विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. यावेळी विद्यानिकेतन पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या रुपाली भालेराव (पवार) पी.एम हायस्कुल च्या प्राचार्या सुनीता शेगर, विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी चे प्राचार्य अमोल जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

स्त्रियांना शिक्षणाचे दार उघडून सर्वांगीण प्रगतीस कारणीभूत ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती विद्यार्थांना देण्यात आली. या वेळी संकुलनातील सर्व महिला शिक्षकांचा सन्मान प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिनता दुपारे यांनी केले तर आभार अतुल बारवे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे