जिल्हा परिषद शाळा धाबेवाडी येथे सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन

1 min read

धाबेवाडी दि.३:- जिल्हा परिषद शाळा धाबेवाडी (ता. खेड) येथे बुधवार दि.३ रोजी स्त्री शिक्षणाच्या जननी, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या जयंती निमित्त त्यांचे प्रतिमापुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायफड केंद्राचे केंद्र प्रमुख लोखंडे हे होते. शाळेतील विद्यार्थी आदित्य तिटकारे व ऋतुजा तिटकारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या महत्त्वपूर्ण कार्याविषयी माहिती सांगितली. सदर कार्यक्रमास विद्यालयातील उपशिक्षक प्रविण पारवे, कोकाटे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारवे यांनी केले. व आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे