श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने नुतनीकरण केलेल्या भोजनगृहाचा लोकार्पन सोहळा संपन्न

1 min read

ओझर दि.२:- श्री क्षेत्र ओझर हे अष्टविनायक तिर्थक्षेत्रांपैकी अत्यंत पवित्र व विकसीत तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते येथे येणा-या भक्तांना सुख सुविधा पुरविण्याचे काम देवस्थान ट्रस्ट सातत्याने करत आहे. येथे येणाऱ्या भाविकांना भोजणाच्या सोईसाठी देवस्थान दुस्टने अत्याधुनिक सुखसोईनी परिपूर्ण असे महाप्रसादालय सुरु केले. सदर महाप्रसादालयाचा लोकार्पन सोहळा संकष्टी चतुर्थीचे शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे शुभहस्ते संपन्न झाला. लोकार्पन सोहळ्या प्रसंगी बोलताना मंत्रीमहोदयांनी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे व विश्वस्त मंडळ राबवित असलेल्या विविध कामांचे कौतुक केले. देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी केलेल्या निवेदनानुसार देवस्थानला पार्किंगसाठी सात कोटी रुपये खर्चांची वाहनतळाची इमारत व नौकाविहासाठीची परवानगी मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कबूल केले. सदर कार्यक्रमाला भोसरीचे लोकप्रिय आमदार महेश लांडगे, जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके, भाजपच्या नेत्या आशाताई बुचके. पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादालयाच्या नुतनीकरणचा सोहळा संपन्न झाला. सर्व पाहुण्यांचे स्वागत देवस्थानचे सचिव दशरथ मांडे विश्वस्त बी व्ही अण्णा मांडे ,आनंदराव मांडे, किशोर कवडे ,गणपत कवडे, श्रीराम पंडीत,मंगेश मांडे.विजय घेगडे, राजश्री कवडे,कैलास मांडे ओझरच्या पहिल्या आदर्श सरपंच अस्मिता कवडे,विद्यमान सरपंच राजश्री कवडे सरपंच मथुरा कवडे ,उपसरपंच विठ्ठल जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष दत्तापाय कवडे ,दिलीप कवडे,ग्रामविकासचे अध्यक्ष संतोष मांडे व गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे