‘शुभम तारांगण’ ठरतोय ग्राहकांचे आकर्षण बिंदू; आळेफाटा येथे जुन्नर तालुक्यातील सर्वांत मोठा हरित गृहप्रकल्प; सोयीसुविधांची रेलचेल

1 min read

आळेफाटा. दि.२ : श्री संत ज्ञानेश्वर माउलींनी ज्यांच्या मुखातून वेद बोलविले, त्या रेड्याची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या श्रीक्षेत्र आळे येथील मंदिराच्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेले व पुणे-नाशिक व नगर-कल्याण या दोन राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा हे शहर वसलेले आहे.

या शहराला आर्थिक आणि व्यापारीदृष्ट्या विशेष महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. येथे विविध उद्योगधंद्यांचा विकास होत असून, येथे शहरीकरणाला वाव निर्माण झाला आहे. म्हणूनच शुभम डेव्हलपर्सने ‘शुभम तारांगण’ हा हरित गृहप्रकल्प येथे उदयास आलेला आहे.

या ठिकाणी पर्यावरणपूरक सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ४०० पेक्षा अधिक कुटुंबीयांना राहण्याची उत्तम सोय. ५०० पेक्षा अधिक विविध झाडांच्या सानिध्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे, उत्तम सुरक्षा व्यवस्था, मुबलक मोकळी जागा, प्ले ग्राउंड, ओपन जिम, क्लब हाऊस, बॅडमिंटन कोर्ट,

वॉकिंग ट्रॅक. जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, सौर विद्युत प्रकल्पाचा समावेश आहे. शुभम डेव्हलपर्स निर्मित ८.५० एकरात ‘शुभम तारांगण’ हा हरित गृहप्रकल्प लवकरच पूर्णत्वास येत असून, ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये ४२४ सदनिकांपैकी १७२ सदनिका तयार झाल्या आहे. १७२ कुटुंबे या ठिकाणी राहत आहे.

नव्याने २५२ सदनिकांचे काम सुरू आहे. लोकांच्या विशेष पसंतीचा, तालुक्यातील सर्वात मोठा गृहप्रकल्प आळेफाटा शहराच्या विकासात हातभार लावत आहे. विशेष म्हणजे ‘शुभम तारांगण गृहप्रकल्प’ महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ कडून ‘प्लॅटिनम रेटिंग’ हा मान मिळालेला पहिलाच हरितगृह प्रकल्प आहे.

शुभम तारांगण प्रकल्पाचे वैशिष्टे 
■ व्यापारीदृष्ट्या केंद्रबिंदू असलेल्या मुख्य शहरात प्रकल्प ■ बस स्टॅन्डपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर ■ प्रकल्पाला दोन्ही बाजूंनी राष्ट्रीय महामार्ग जोडलेला. ■ सुंदर, स्वच्छ नैसर्गिक वातावरण, जे लहान मुलांना, वृद्धांना पोषक ■ शहरातल्या लोकांना सहजपणे आपल्या गावाला जोडता येते.■ सर्व क्षेत्रातील लोकांचा रहिवास असलेले उत्तम ठिकाण■ परिसरात विविध वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांचा समावेश.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे