सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची वडगाव पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्या तीन हॉटेल चालकांवर धडक कारवाई.

1 min read

लोणावळा दि.२८:-लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे शिवणे व मळवंडी ढोरे परिसरातील हॉटेल चालक हे त्यांचे हॉटेल मध्ये अवैधपणे दारूविक्री करीत आहेत. व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी बुधवार दिनांक 27 रोजी त्यांचे कार्यालयाकडील डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता मळवंडी ढोरे तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील 1) हॉटेल जगदंब, व मौजे शिवणे येथील 2) हॉटेल पाटीलवाडा मटण खानावळ. 3) हॉटेल कैलास चायनीज अशा तीन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात नमूद हॉटेलचे चालक यांचे ताब्यातून एकूण 19,815 रू. किमतीचा अवैध, विनापरवाना विक्री करण्यासाठी ठेवलेला दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये तीन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोना रईस मुलानी व वडगाव मावळ स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे