वेळेत जेवण तयार न केल्याने पत्नीचा खून करणारा पती गजाआड
1 min readपुणे दि.२५:- जेवण तयार न केल्याने पत्नीला बेदम मारहाण कारून तिचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.२२) कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
मधुरा तानाजी कांबळे (वय ४२, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) हे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तानाजी शिवाजी कांबळे (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय १९) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
तानाजीला दारूचे व्यसन आहे. तो शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. जेवण तयार न झाल्याने तो पत्नी मधुरा यांच्यावर चिडला. त्याने रागाच्या भरात मधुरा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्याप्रकरणी तानाजीला अटक करण्यात आली आहे.