राज्यातील सर्व जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखविले जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
1 min readपुणे दि.२३:- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. राज्यात ४० कोटी खर्च करून ३६ जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे महानाट्य दाखवले जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त दिनांक २ ते ६ जून, २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी त्या त्या जिल्ह्यातील नामवंत मंडळींना महानाट्याला बोलावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी,
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली वारशाला प्रसिध्दी मिळावी, या उद्देशाने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.