अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा पंचायत समिती जुन्नर येथे आंदोलन

1 min read

जुन्नर दि.२३:- (प्रतिनिधी:-सतिश शिंदे) – जुन्नर तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांचे विविध मागण्यांकरीता पंचायत समिती जुन्नर आवारात लक्षणीय सरकारविरोधी आंदोलन सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी यावेळी सरकारविरोधी घोषणा दिल्या व मागणी जोपर्यंत मंजूर होणार नाही.

तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी पाठींबा दिला व भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सोबत राहणार असल्याचा मायेचा आधार या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिला.
यावेळी अमोल लांडे राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, दिपक घुटे सरपंच देवळे, नांगरे गुरूजी, निता कारभळ हडसर सरपंच, शिवाजी बोऱ्हाडे ग्रा. पं. सदस्य देवळे, दिनकर शिरगिरे, जनार्दन सांगडे सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठींबा दर्शविला भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे