मराठा क्रांती मोर्चा व शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात पुणे जिल्हा शांतता कमिटीची बैठक संपन्न
1 min readपुणे दि.२२:- पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील कार्यरत असणाऱ्या शांतता कमिटीची बैठक अधीक्षक कार्यालय येथील भीमाशंकर या सभा गृहात शांततेच्या वातावरणात संपन्न झाली.
अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली. येत्या २४ डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाची मनोज जरांगे पाटील यांची सभा मुंबई या ठिकाणी होणार आहे.
त्याच बरोबर 1 जानेवारी रोजी शौर्य दिन असल्याने कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मराठा समाजाचे आंदोलन शांततेत कशा पद्धतीने केले जावे या साठी देखील काही उपाय योजना केल्या जातील त्या समास्या शांतता कमीटीच्या सदस्यांनी मांडल्या.
या वेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी युवराज मोहिते आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.