बांगरवाडीत कोल्ह्याच्या हल्ल्यात महिला जखमी

बेल्हे दि.१५ : बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली असून परिसरात घबराट पसरली आहे. सुमन ज्ञानेश्वर ठुबे (वय ४८, रा. बांगरवाडी ता.जुन्नर) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास घडली. सुमन या शेती कामासाठी मळ्यात जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला करत हाताला व पायाला चावा घेतला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर कोल्ह्याने पळ काढला. सुमन यांना प्राथमिक उपचारासाठी बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे