खेड तालुक्यातील चर्होलीत भव्य बैलगाडा शर्यत; ८३ मोटरसायकल, चार चांदीच्या गदा, कार, बोलेरो पिकप, ट्रॅक्टर, स्कॉरपिओ, टाटा एस गोल्ड, बुलेट अशा बक्षिसांची खैरात

1 min read

चर्होली दि.१४:-चर्होली तालुका खेड येथील भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीत पहिल्या क्रमांकात येणाऱ्या बैलगाडयासाठी ८३ मोटरसायकल, घाटाच्या राजासाठी चार चांदीच्या गदा,कार, बोलेरो पिकप, ट्रॅक्टर, स्कॉरपिओ, टाटा एस गोल्ड, बुलेट अशा बक्षिसांची खैरात असुन १३ ते १७ डिसेंबर स्पर्धा होत असुन हजारोंच्या उपस्थितीत स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. आज पहिल्या दिवशी प्रथम क्रमांकात ३७, द्वितीय क्रमांकात ६५, त्रुतिय क्रमांकात ४८ बैलगाडे धावले.यात रामभाऊ वारींगे वारंगवाडी मावळ सह सचिन नवले रावडी जुगलबंदी सेकंद ११.२७ हा ठरला.आयोजक मी सेवेकरी सोशल फाउंडेशन चे सुधीर मुंगसे आणि सोमनाथ मुंगसे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ऊत्तम नियोजन केल्याने ७५० बैलगाडा मालक सहभागी झाले असून. रोज १७५ बैलगाडे धावणार आहेत आज पहिल्या दिवशी हा घाटाचा राजा ठरला.यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्राध्यापक सुरेखा निघोट, भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट, शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी कराळे, राष्ट्रीय खेळाडू पोपटराव थोरात यांचे वतीने समालोचक माऊली पिंगळे, प्रदिप भोर, निलेश रणपिसे, सुनिल मोरवे, अभिषेक ढेरंगे, स्वप्निल सोनवणे यांना बैलगाडा शर्यतीचे अनाउंसिंग करून बैलगाडाशौकिन,मालक शर्यतीतील बैलांना आपल्या पहाडी आवाजाने निवेदन करून शर्यतींना अफाट लोकप्रियता मिळवुन दिल्याबद्दल समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध बैलगाडा मालक सुखदेव भुजबळ, सरपंच कासारी शिरूर, शंकर काटे पिंपळे सौदागर, अविनाश वाबळे मोई, अरुण घुंडरे पाटील आळंदी, विकास नायकोडी चाकण, शशिकांत सणस, पप्प पिंगळे, किरण गवारे शिवसेना ऊपतालुकाप्रमुख खेड उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे