ऊस बिलातून पाणीपट्टी वसूल करण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध अंबादास हांडे

1 min read

जुन्नर दि.१९:- शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीपट्टीमध्ये ६ पट वाढ केलेली आहे पूर्वी सहाशे रुपये पाणीपट्टी आकारली जात होती परंतु शासनाच्या नवीन जीआर नुसार त्यामध्ये सहापट वाढ केली आहे म्हणजेच ४२०० हजार रुपये एकरी पाणीपट्टी इथून पुढे आकारली जाणार आहे. कारखान्यांच्या मार्फत पाणीपट्टी वसुलीचा तागाता पाटबंधारे विभागाने लावलेला आहे कारखान्यांशी शेतकऱ्यांकडून वसूल करण्यासाठी पाटबंधारे विभागाने कारखान्याचे पत्र व्यावहार केलेला आहे. तेव्हा आपल्या माध्यमातून मग आपला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना सहकारी असेल, भीमाशंकर कारखाना आंबेगाव असेल, किंवा शेजारच्या तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना असेल त्या तीनही कारखान्याच्या प्रशासनाला मी आव्हान करतो की पाटबंधारे विभाग त्यांची वसुली करण्यासाठी त्यांना कोणताही सहकार्य करू नये. शेतकऱ्यांचा त्या सक्त वसुलीला पाणीपट्टीच्या विरोध आहे. कारखाना स्तरावरून आपण शेतकऱ्यांच्या मानगोटीवर बसून शासनाची वसुली करून दिली तर संबंधित कारखान्यांवरती आंदोलन छेडण्यात येईल ते मी आज आपल्या प्रसार माध्यमातून आणि कपात करण्याला सुद्धा विरोध आहे त्याचं कारण असं एक कारखान्याच्या माध्यमातून वसुली करायची हा जो घाट घातलेला आहे. पाटबंधारे विभागाने त्यास आमचा विरोध आहे तेव्हा जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यातील शेतकरी बंधूंना आम्ही आव्हान करतो की आपण वाढीव पानपट्टीचा एकही रुपया भरायचा नाही. मूळ पानपट्टी आहे ती पानपट्टी ती सर्व शेतकऱ्यांनी भरावी असे आवाहन शेतकरी संघटने कडून करण्यात आले. प्रत्यक्ष श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर जाऊन बैठक घेऊन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष तानाजी बेनके, शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, तालुकाध्यक्ष जुन्नर आघाडी शेतकरी संघटना प्रमोद खांडगे पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे